सन २०१८ मध्ये संत रामलाल बाबा गेंदाई शिक्षक प्रसारक मंडळ, गणोरी येथे ज्ञानेश्वरी गुरुकुल या शैक्षणिक संकुलनाला सुरुवात केली. ६ जून २०१८ या दिवशी राज्याभिषेक दिनाचे अवचीत्य साधत जणू ज्ञानाचा शुभारंभ या ठिकाणी विद्यमान विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे नाना ह्यांच्या उपस्थिती मध्ये प्रारंभ केला. संत ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्याकडून पसायदानाच्या ओवीला ‘दुरितांचे तिमिर जावो’ ह्या विचारला ब्रीदवाक्य बनवत शिव छत्रपती ह्यांच्या पराक्रमाला शिरसधान मानून पंच क्रोशीतील पहिले ज्ञानेश्वरी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा बहुमान मिळवला. विविध उपक्रमशील शिक्षण पद्धतीच्या आधारावर ज्ञानरचनावाद, परिसर अभ्यास, क्षेत्र भेटी, निसर्ग सहली, पुस्तकातील अभ्यास प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्याची कला आज देखील ज्ञानेश्वरी गुरुकुल मधील मुल मोठ्या आनंदाने प्रवेश घेत असतात. वयोगट ३ वर्षातील मुल इथे आनंदाने आपले मनोगत निर्भीडपणे व्यक्त करतांना कायम अग्रेसर असतात. कधी तालुका तर कधी जिल्हा पातळीवर विविध उपक्रमात शाळा आणि विद्यार्थी समवेत इथले शिक्षक देखील अग्रेसर असतात. सामाजिक माध्य्मानातून … अधिक माहिती येथे वाचा