संत रामलाल बाबा गेंदाई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित

ज्ञानेश्वरी गुरुकुल, गणोरी ता फुलंब्री जि छत्रपती संभाजीनगर : ९७३०३३०७०३, ९८५२५२११५२

पाहिले बेलपत्र : ज्ञान

ज्ञानेश्वरी गुरुकुल मध्ये असेच बेल पत्र मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी ज्ञानरुपी बेलपत्र अर्पण करत असतो.

ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान. – साने गुरुजी

स्पर्धेच्या युगात मुलांच्या जडण घडणी मध्ये परिपूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. ज्ञानेश्वरी गुरुकुल मध्ये असेच बेल पत्र मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी ज्ञानरुपी बेलपत्र अर्पण करत असतो.
जिथे मुलांची चालण्याची पाळण्याची स्थिती असते त्याच ठिकाणी आम्ही शिक्षणातील अ- आ – ई सोबत इंग्रजी गणित आणि बदलत्या घडामोडीनुसार त्यांच्यात बिंबवण्याचे कार्य करत असतो.
ज्ञानाची जोपासना बालवयातच रुजवल्या गेली कि भविष्यात हीच बालक मातृभूमी जन्म भूमीसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देश सेवा-राष्ट्र सेवा करण्यात अग्रेसर असतील. हाच मानस कायमस्वरूपी मुलांच्या जडण घडणी मध्ये ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ज्ञानेश्वरी गुरुकुल मध्ये करत असतो.
कधी मुलांच्या हसत खेळत छोट्या छोट्या खेळातून तर कधी शिक्षकांच्या कृती युक्त शिक्षण पद्धतीतून अशा विविध ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा अवलंब करून मुलांमध्ये त्यांना त्यांच्या क्षमतेचा आधार घेऊन पहिले बेलपत्र त्यांच्यात रुजवण्याचे बिंबवण्याचे अविरत कार्य करत असतो.

दुसरे बेलपत्र : गुणवत्ता

आज, शिक्षण हे मानवी भांडवलाचे उत्पादन मानले गेले पाहिजे, ज्याचा एक महत्त्वाचा घटक बौद्धिक भांडवल आहे.

शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण होय. – स्वामी विवेकानंद

आज, शिक्षण हे मानवी भांडवलाचे उत्पादन मानले गेले पाहिजे, ज्याचा एक महत्त्वाचा घटक बौद्धिक भांडवल आहे. जर आपण आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासाच्या ट्रेंडमध्ये मानवी भांडवलाची वाढती भूमिका लक्षात घेतली, तर हे लक्षात येईल की शिक्षण मुख्य होत आहे. शिक्षण हे आपले भविष्य आहे असे म्हणणे पुरेसे नाही. हा वाक्प्रचार घोषवाक्यात बदलला आहे, ज्याचा अर्थ आता विचार केला जात नाही. शिक्षण हे सक्रिय ज्ञानाचे उत्पादन आहे जे त्याच्या सर्व दिशा आणि ट्रेंडमध्ये सामाजिक विकासाची गती सुनिश्चित करते. शिक्षण म्हणजे सुसंवाद आणि मानवीकरण होय सार्वजनिक जीवन, ही माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक चळवळ आहे.
यासाठीच आम्ही मुलांच्या प्राथमिक शिक्षणापासून शालेय अभ्यासक्रम आणि मुलांची व्यक्तीक पातळी हि उंचावत मुलांमध्ये बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न गुणवत्ता वाढीवर भर देत असतो. मुलांची गुणवत्ता वाढवणे म्हणजे केवळ पाठांतर नाही तर शिकवलेल्या प्रत्तेक पाठाचे सार्थ ज्ञान त्यांच्यात रुजवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची सांगड होय. ज्या मधून मुले आनंदाने आणि आवडीने शिक्षण गुणवत्तेच्या रुपात आत्मसात करत असतात. हीच आमची भविष्याचा वेद घेणारी पद्धती आम्ही ज्ञानेश्वरी गुरुकुल मध्ये राबवत असतो. हे दुसरे बेलपत्र यासाठीच मुलांमध्ये अर्पण करत आहोत.

तिसरे बेलपत्र : संस्कार

माणूस हा बुद्धीशाली प्राणी असल्यामुळे ज्ञानार्जन ही बौद्धीक गरज आहे.

संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. माणूस हा बुद्धीशाली प्राणी असल्यामुळे ज्ञानार्जन ही बौद्धीक गरज आहे. परंतु विचारसंक्रमण किंवा ज्ञानदान ही बौद्धीक वैचारिक प्रक्रिया आणि संस्कारप्रक्रिया यांत गुणात्मक भेद आहे. शास्त्रज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती ज्ञानी, विद्वान किंवा पंडित होते. तंत्रज्ञान व विविध कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती निष्णात, कुशल तंत्रविशारद होते. परंतु धार्मिक, नैतिक, साहित्यिक, सौंदर्यात्मक किंवा कलात्मक संस्कारांतून माणसाच्या वृत्तीला वळण लागते. व्यक्ती सत्प्रवृत्त, सुसंस्कृत, सूज्ञ होते. तिच्यात सद्भिरूची निर्माण होते. ती सुजाण नागरिक होते. जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते. म्हणूनच मुलानाचे बालवयापासूनच विविध संस्कार होणे हे आदर्श नागरिक घाविण्याचे बाळकडू आम्ही बाल वयातूनच देत असतो. यासाठी विविध उपक्रम मग राष्ट्रभक्ती, असतो किवा समाजाची जाणीव बाळगणारी अनेक महान राष्ट्रपुरुष असो, ह्यांची चार्टर वेळोवेळी मुलांमध्ये रुजवण्यासाठी त्याची जीवनकथा मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य आम्ही वेळो वेळी करत असतो. नवे तर ते आमचे कर्तव्यच आहे असे आम्ही जाणून मुलांमध्ये रुजवतो. कारण चारित्र्य संपन्न तरुण पिढी हि उज्वल भारत देशाची मुख्य आधारस्तंभ असली कि देशाचे भविष्य देखील उज्वल असल्याशिवाय राहनार नाही असेच आम्ही मानतो. हीच आमची ज्ञानेश्वरी गुरुकुल ची शिक्षण प्रणाली…! हे संस्कारूपी बेलपत्र मुलांमध्ये अर्पण.

चौथे बेलपत्र : कला-कौशल्य

शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते.

ज्या देशामध्ये उच्च आणि उच्चतम कौशल्य आहेत ते जागतिकीकरणाची आव्हाने आणि संधीशी प्रभावीपणे जुळवून घेवू शकतात.
शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो.
आम्ही कुल्या बंद खोलीत शिकवत नाही किवा वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी एकच पद्धतीने मुलांना तीच ती चालत आलेली घोकमपट्टी देखिल मुलांमध्ये फिरवत नाही म्हणूनच ज्ञानेश्वरी गुरुकुल ची मुल परीक्षा देखील आगदी आनंदाने आणि हस्त खेळत देतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे पहिले धेय्य असते. पालकांची पहिली पसंती देखील ज्ञानेश्वरी गुरुकुल हीच शाळा असते हे आम्हाला वेगळ सांगायला नको.
ह्या सर्व फोटो मधून आपल्या सर्वाना हे दिसतच असेल ह्या मध्ये काही वेगळी शंका नको. म्हणूनच माझ्या सारखे नवीन शिक्षक सुद्धा नव नवीन संधी शोधात असतात आणि शाल देखील आम्हाला संधी देत असते. ज्या देशामध्ये उच्च आणि उच्चतम कौशल्य आहेत ते जागतिकीकरणाची आव्हाने आणि संधीशी प्रभावीपणे जुळवून घेवू शकतात. भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असून भारताकडे जगभरातील विविध अर्थव्यवस्थांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. तसेच स्वतःच्या वाढीच्या क्षमतेमुळे स्वतःच्या गरजा पुरविण्याची क्षमता भारतात आहे. हे कौशल्यरूपी विकसीत बेलपत्र मुलांमध्ये अर्पण.

पाचवे बेलपत्र : राष्ट्रभक्ती

राष्ट्रभक्ती जे खरे देशभक्त असतात ते देशसेवेसाठी सदैव तत्पर असतात.

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले ।। राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो ॥१॥

देशभक्ती म्हणजे देशाप्रती अपार प्रेम आणि आदराची भावना. देशप्रेमाची भावना माणसांना एकमेकांच्या जवळ आणते आणि परस्पर प्रेम वाढवण्याचे काम करते. जे खरे देशभक्त असतात ते देशसेवेसाठी सदैव तत्पर असतात. देशाच्या विकासात हातभार लावणे आणि देशाचे सक्षमीकरण करणे ही देखील देशभक्ती आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी देशाच्या संरक्षणासाठी, स्वाभिमानासाठी आणि विकासासाठी काम केले पाहिजे. देशाची प्रगती आणि विकास यावर आपला विकास अवलंबून आहे हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. बालवयातच जीवनात महापुरुष, राष्ट्र पुरुष समाज सुधारक आणि महामानव ह्यांचे जीवन चरित्र हे खरे तर प्रत्तेकाच्या जीवनाला मार्गदर्शनाची एक जिवंत मशाल असते. म्हणूनच आम्ही’ ।। ज्ञानेश्वरी गुरुकुल ।।’ प्रत्तेक महापुरुशांची जयंती पुण्यतिथी त्यांनी आपल्या प्रत्तेकाला दिलेल्या शिकवणुकीच्या माध्यमातून बालवयात रुजवत आसतो. त्यासाठी संत गाडगे बाबा ह्यांचे स्वच्छता अभियान असेल किवा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची प्रेरनादाई प्रसंग असेल, महात्मा फुले सावित्रीबाई फुले ह्यांचे शैक्षणिक योगदान असेल किवा, महात्मा गांधी ह्यांचे सत्य अहिंसा आणि राष्ट्र भक्ती असेल किवा लोकमान्य टिळक ह्यांच्चे जाज्वल्य प्रेरक राष्ट्र भक्ती, डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समाजातील प्रत्तेक घटकाला दिली जाणारी समानतेची शिकवण किवा राजर्षी शाहू महाराज ह्यांचे शिक्षण आणि समाज ह्या विषयी जाणीव. ‘वाऱ्यांना हेच सांगत राहा, उजेड असेल, दिवे तेवत ठेव, ज्याला आम्ही रक्त देऊन रक्षण केले, तो तिरंगा तुमच्या हृदयात सदैव ठेवा.’ वंदे मातरम राष्ट्रभक्तीचे अखंड तेवणारे बेलपत्र कायमस्वरूपी राष्ट्रविकासास अर्पण.

सहावे बेलपत्र : खेळ

एकात्मता आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत करणे हे राष्ट्र उभारणीत खेळाचे मुख्य योगदान आहे.

तुमची खरी क्षमता उलगडण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या स्वतःच्या मर्यादा शोधाव्या लागतील आणि मग त्या पार पाडण्याचे धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे. एकात्मता आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत करणे हे राष्ट्र उभारणीत खेळाचे मुख्य योगदान आहे. संघ-बांधणी आणि सहकार्य ही शाळेतील क्रीडा क्रियाकलापांद्वारे तयार केलेली मूल्ये आहेत. खेळ आम्हाला सशक्त आणि जगण्याचे प्रशिक्षण देतात. हे आम्हाला सकारात्मक विचार करण्यास शिकवते आणि सतत कृती करण्यास प्रेरित करते. हे आपल्याला पराभूत झालेल्या निराश होण्याऐवजी कठोर परिश्रम करण्यास शिकवते जेणेकरुन आपण पुढच्या वेळी जिंकू शकाल. शाळेतील खेळ विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करण्यास मदत करतात. ते विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवतात आणि त्यांना त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करण्यात मदत करतात. जो विद्यार्थी खेळात सक्रिय असतो, त्याला स्वाभाविकपणे जास्त आत्मसन्मान, सुधारित सामाजिक संवाद आणि जीवनाबद्दल अधिक सकारात्मक दृष्टिकोन असतो. खिलाडूवृत्तीची भावना एखाद्या व्यक्तीला जीवनातील चढ-उतारांना अधिक सुंदरपणे सामोरे जाण्यास मदत करते. मुलांच्या शैक्षणिक जीवनात खेळ स्पर्धा ह्याचे अनन्य साधारण महत्व असते. काही मुल शिक्षणात नाही तर खेळत देखील सर्वोच्च नेर्तुव करू शकतात, ह्याची उदाहरण ह्याची देयची झाली तर पैलवान खाशाबा जाधव, सचिन तेंडूलकर, आजची नवे म्हंटली तर विराट कोहली. म्हणूनच आम्ही ।। ज्ञानेश्वरी गुरुकुलात ।। उद्या आपल्या गणोरी गावातून देखल एक सचिन तेंडुलकर, विराट रोहित, सानिया नवे आपल्या मधूनच यावी या साठी छोटे छोटे खेळ शालेय स्तरावर घेत असतो. कुणास ठाऊक एखाद्या अश्याच छोट्या खेळातून एखादा सर्वोच्च खेळाडू लपलेला असेल. म्हणूच कदाचित आपल्यातील अश्विनी सपकाळ कुस्ती सारख्या पुरुषांच्या खेळ प्रकारातून राज्य पातळीवर आपले आणि आपल्या गाव चे नाव रोषण करत आहे. खेलाडुवृत्तीचे बेलपत्र मुलांच्या जडण- घडणीला अर्पण.

सातवे बेलपत्र : विज्ञान-तंत्रज्ञान

मानवी भौतिक आयुष्य हे सोयीस्कर बनवण्यासाठी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

आज एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान जेवढे विकसित झालेले आहे तेवढे यापूर्वी कधीही झाले नव्हते. विज्ञानाचा शोध म्हणजे भौतिक अस्तित्व जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. त्यातून ते विज्ञान कसे काय विकसित करू शकतो आणि सोयीस्कररीत्या मानवी जीवनात कसे वापरू शकतो, त्यासाठी केलेला खटाटोप म्हणजे तंत्रज्ञान. विज्ञान हा एक पद्धतशीर मार्ग आहे ज्यामध्ये ज्ञान मिळविण्यासाठी आणि कौशल्य सुधारण्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान हे विज्ञानाचा व्यावहारिक अनुप्रयोग आहे जे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. विज्ञान हा एक पद्धतशीर अभ्यास आहे आणि तंत्रज्ञान त्यातूनच बाहेर पडते. मानवी भौतिक आयुष्य हे सोयीस्कर बनवण्यासाठी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तंत्रज्ञान हा विज्ञानाचा कार्यभार म्हणता येईल. सर्व वैज्ञानिक नियम आणि दृष्टिकोन हे विविध तांत्रिक पद्धतीने उपयोगात कसे आणता येतील याचा अट्टाहास म्हणजेच आपण त्याला प्रगती समजतो. भविष्यातील सुरक्षितता आणि संरक्षणासाठी इतर देशांप्रमाणेच विकसित आणि विकसनशील होण्यासाठी इतर देशांनाही विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. हे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे जे इतर कमकुवत देशांना विकसित आणि सामर्थ्यवान बनविण्यात मदत करते. शिक्षणाला विज्ञानाची आणि विज्ञानाला तंत्रज्ञानाची साद घातली कि मुलांची प्रगती आणि विकासाची गती नक्कीच मिळते. भविष्यात भारत देशाला जागतिक पातळीवर सन्मानाने उभा राहायचे असल्यास आज घडीला मुलांची शैक्षणिक वाटचाल हि बदलत्या तंत्रज्ञानाला जोडणारी विज्ञानाशी नाते जोडणारी असावी. याचे उत्तम उदाहरण चंद्रयान ३ ची यशस्वी वाटचाल करत दक्षिण ध्रुवावर जाणारा एकमेव देश भारत ठरला. एवढ्यावरच आपण थांबलो नसून आदित्य एल-१ चे प्रक्षेपण या आणि अश्या किती तरी अनेक उड्डाण आणि प्रगती समोर देश जागतिक पातळीवर सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. हे बेलपत्र यासाठीच अर्पण.

आठवे बेलपत्र : पर्यावरण

ज्या पद्धतीने कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थी हा त्या घराचा उद्याचा एक आधार स्तंभ असतो.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे । आळविती ।।

संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे तो म्हणजे असा की, वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या भागांमध्ये वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो. आपल्या आजूबाजूला असलेली झाडे ही आपल्याला अन्न, वस्त्र, फळे, फुले, पाने, आयुर्वेदामध्ये औषध उपचार म्हणून अनेक झाडांचा वापर केला जातो. आपल्या सभोवतालचे अनेक लहान पक्षी या झाडांच्या आधारेच आपले घर बांधतात व विसावा घेतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या या वृक्षांमुळे निसर्ग सुंदर होऊन जातो. ज्या पद्धतीने कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थी हा त्या घराचा उद्याचा एक आधार स्तंभ असतो. त्याच पद्धतीने पर्यावरणातील प्रत्तेक झाड हे पर्यावरण संतुलनाचे अमुल्य योगदान असते. म्हणूनच आम्ही पर्यावरण पूरक ज्ञानेश्वरी गुरुकुल शाळेचा ५ वा वर्धापन दिन १००० बीज गोळे ह्या जपानी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही मुलांच्या आणि शिक्षकांच्या माध्यमातून बनविली प्रत्तेक मुलाला घरातील फळांच्या बिया आणि अंगणातील झाडाच्या वेग वेगळ्या बिया वाया न घालवता आपण अनोखा संकल्प करू करू शकतो हि शिकवण दिली. एवढेच नाही तर दर वर्षी विविध माध्यमातून पर्यावरणाशी सांगड घालून आम्ही वृक्ष लागवड करत असतो. हाच एक भाग आमच्या शिक्षण पद्धतीचा मानून शाळेत ज्या प्रमाणे मुलांवर शिक्षणाचे बाळकडू दिले जातात तसेच प्तात्तेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनावर पर्यावरणाशी असलेले आपले नाते संत तुकाराम महाराज ह्यांच्या अभंगातील ओवीप्रमाणे बिंबवण्याचे कार्य अविरत पाने करत असतो. पर्यावरणाशी असलेले नाते अधिक बळकट करून, पर्यावरणाशी सांगड घालून प्रगतीचा मार्ग, भविष्याचा वेद घेऊन करत असतो म्हणूनच बेलपत्राचे आठवे पर्ण ज्ञानेश्वरी गुरुकुल च्या माध्यमातून पर्यावरणास अर्पण करत असतो.

नववे बेलपत्र : सामाजिक जाणीव

आज घडीला प्रत्तेकानी एक असे आणि एकमेकांविषयी मानवतेची मशाल हाती घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सकळांस कळो, मानवता, राष्ट्रभावना । हो सर्वस्थळी मिळूनि, समुदाय-प्रार्थना । उद्योगि तरुण वीर, शीलवान दिसू दे। दे वरचि असा दे ॥२॥ राष्ट्र संत तुकडोजी महाराज

भारत देश विविध जाती धर्म पंथ आणि संप्रदाय यात विभागलेला आहे. तरी देखील आपण सर्व भारतीय म्हणून आपली स्वतंत्र्य ओळख जगणे भारतीय म्हणून गणली आहे. इथे प्रत्तेक जन आपल्या संस्कृती आचरण आणि परंपरेची जपवणूक आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन करत असतो. यासाठी आपण देखील या सर्व घटकाचे एक देणे लागतो जि कि पुढील पिढीला आपल्या संस्कृती आणि परंपरेची साखळी घट्ट करण्यास मदत मिळते. आज घडीला प्रत्तेकानी एक असे आणि एकमेकांविषयी मानवतेची मशाल हाती घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही वेळो वेळी विविध समाजातील प्रत्तेक आदर्श कृती अंगीकारत असतो आणि त्यातून बोध घेऊन मुलांमध्ये त्यानुसार संस्काराचे बीजारोपण करत असतो. राष्ट्र संत तुकडोजी महाराज ह्यांनी आपल्या ग्रामगीता मध्ये छान या विषयी वर्णन देखील केलेलं आहे. मुलांच्या बाल वयातच जर आपण हि बीज वेळोवेळी आपल्या विविध उपाय योजना मधून रुजवत असेल तर नक्कीच एक कृतीशील आणि आदर्श समाज राचा ह्याच ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हीच खरी भावी पिढी घडण्याचे संकेत असेल आणि आपली भारतीय म्हणून होणारी ओळख देखील तितकिच आदर्शवत असेल. कारण संत ज्ञानेश्वर महाराज ह्यांनी देखील आपल्या ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथात पसायदानातून एका ओवीच्या माध्यमातून आपली इच्छा व्यक्त केली आहे. हे बेलपत्र यासाठीच अर्पण. जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ॥२॥ संत ज्ञानेश्वर महराज (माउली)

दहावे बेलपत्र : सर्वांगीण विकास

आपण ६४ गुणांच्या अधिपतीची पूजा करतो अर्थात मानवाच्या अंगी विविध अशा कलागुणांचा वाव असतो.

कोणत्याही शिक्षण संस्थेचा मुलांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे. शैक्षणिक, नैतिकता, बुद्धी, शरीर, सामाजिक कौशल्ये आणि सौंदर्यशास्त्र या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक आणि संतुलित विकास म्हणजे सर्वांगीण विकास (All Round Development of Kids) होय. कोणत्याही शिक्षण संस्थेचा मुलांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे. शाळेत शिकविल्या जाणारी कुठलीही संकल्पना किवा कुठलाही उपक्रम हा मुलांच्या विविध गुणांचा विकासाचा केंद्रबिंदू असावा. आपण ६४ गुणांच्या अधिपतीची पूजा करतो अर्थात मानवाच्या अंगी विविध अशा कलागुणांचा वाव असतो. दैनंदिन जीवनात प्रत्तेकाला अनंत अश्या आदि अडचणीना सामोरे जावे लागते. विविध समस्या ह्या कायमच एकाच विषयाने किवा मार्गाने सोडविणे अशशक्य असते. अश्यावेळी सर्व बाबींचा विचार विनिमय करून मार्ग निवडणे हा कायमस्वरूपी शास्वत धर्म मानल्या जातो. अर्थात शास्वत विकास हा सर्वांगीण विकासाचा मापदंड जरी मानला आणि हेच गुण मुलांच्या बालवयात रुजवली कि नक्कीच एक सक्षम नागरिक घडविणे भारत देश सारख्या विविधतेने नटलेल्या देशात गुण्या गोविंदाने राहेन सोयीस्कर असते. शालेय जीवनात विविध विकासाचा पाय रुजविणे आणि त्यांना चालना देणे हेच जर शिक्षक आणि शाळा ह्यांचे कार्य असेल तर नक्कीच प्रत्तेक शाळेने यात पुढे येऊन मुलांना ह्याच विषयावर घडविणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण म्हणू शकू कि शिक्षक आणि शाळा मिळून विद्यार्थी रुपात भविष्य घडवीत आहेत. या भविष्याला हे बेलपत्र अर्पण.

अकरावे बेलपत्र : वसुधैव कुटुंबकम

या राष्ट्रीय भावनेचे प्रकटीकरण आपल्यासाठी नवीन नाही.

विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे सार आहे. देशभरात वेगवेगळ्या धर्माचे आणि रंगाचे लोक, वेगवेगळ्या चालीरीती आणि प्रथा पाळणारे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि विविध प्रकारचे कपडे परिधान करणारे लोक आपल्याला दिसतात. ही विविधता कोणालाही भारतीय किंवा या भव्य राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांची राष्ट्रीय ओळख मागे घेण्यास प्रतिबंध करत नाही. या राष्ट्रीय भावनेचे प्रकटीकरण आपल्यासाठी नवीन नाही. फार पूर्वीपासून, हा उपखंड विविध वंश, धर्म आणि चालीरीतींच्या लोकांसाठी एक सामान्य घर होता. ते सर्व एकोप्याने आणि शांततेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या संस्कृतीला सर्व जग व्यापून टाकण्यासाठी ही एकात्मतेची भावना वाढवणे कधीच अवघड नव्हते. ज्ञानेश्वर माऊली तर असे म्हणतात की, हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचरा । आपण पै झाला ॥ याचे कारण असे की भारतीय धर्म हे पृथ्वीला आपले कुटुंब मानले पाहिजे या उदार विचाराचे पाईक आहेत. शांततापूर्ण सहअस्तित्व आणि बंधुत्वाची भावना भारतीय संस्कृतीने हजारो वर्षापासून जोपासलेली आहे. भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती आहे जगाला भारतीय संस्कृतीने जी काही अनमोल अशी शिकवण दिली आहे. त्यातील वसुधैव कुटुंबकम् हे शिकवण अत्यंत सारभूत आहे. हीच मुलांमध्ये रुजविणे आहे आज घडीला अत्यावश्यक आहे. हे बेलपत्र यासाठीच अर्पण.

error: Content is protected !!